स्वाधार योजना; सोमवार(दि.21) पर्यंत त्रुटीची पुर्तता करा

 अकोला दि.17(जिमाका)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2020-21 2021-22 या सत्राकरीता अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्याने इच्छुक लाभार्थ्यांना योजनाचा लाभ मिळावा याकरीता सोमवार दि. 21 पर्यंत त्रुटीची पुर्तता करुन अर्ज वसतीगृहात सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले.

            स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थीं हा शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा तसेच शासनाने निर्देशीत केलेल्या अटीशर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जामध्ये आक्षेपित किंवा त्रुटीची पुर्तता करता यावी याकरीता संबंधीत विद्यार्थ्यांनी ज्या वसतीगृहात अर्ज केला त्याठिकाणी त्रुटीची पुर्तता करावे. मुदतीनंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही याची संपुर्ण जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्यांची राहिल.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ