व्हॉलीबॉल खेळाडुंकरीता ‘‘टॅलेंट सर्च’’; प्रशिक्षण शिबीरांचा लाभ घेण्याचे आवाहन

 अकोला दि.29(जिमाका)-  व्हॉलीबॉल खेळ व खेळाडुंसाठी जिल्ह्यात ‘‘टॅलेंट सर्च’’ प्रक्रियेतून 16 वर्षाखालील 30 मुलांसाठी 20 दिवसांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे एप्रिल/मे मध्ये करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरात नोंदणी पात्र खेळाडुंनी गुरुवार दि. 30 मार्च रोजी दुपारी दोन वाजेपर्यत स्वत: उपस्थित राहुन करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. 

व्हॉलीबॉल खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडु निर्माण व्हावे याकरीता  प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी तामिळनाडुचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच विविध स्पर्धामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होऊन भविष्यात या खेळाडुंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

पात्रता : खेळाडु 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावा, उंची सहा फुट, शाळेत शिकत असलेला किंवा नसलेला खेळाडु शिबीरासाठी पात्र ठरणार आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2019-20 या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर शालेय मुले व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम चार क्रमांकाच्या शाळेतील मुले खेळाडु 1 जानेवारी, 2023 रोजी 16 वर्षाखालील व उंची सहा फुट ही अट पुर्ण करीत असलेल्या खेळाडुंना या प्रशिक्षण शिबीरासाठी सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील खेळाडुची निवड करतांना निव्वळ खेळाडुंच्या प्राविण्याचा विचार करुन व वरील दिलेल्या अटी नुसार पात्र ठरणाऱ्या एकुण पाच खेळाडुंची (एक सेंटर, दोन अटॅक व दोन युनिव्हर्सल/ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे) निवड प्रशिक्षण शिबीरासाठी जिल्ह्यामधुन करण्यात येणार आहे.

 जिल्ह्यातील शाळा, क्रीडा मंडळे, संस्थानी अटी पुर्ण करणारे खेळाडु असल्यास सबंधित खेळाडुनी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्माचा दाखला या कागदपत्राच्या छायाप्रतीसह आपल्या नावांची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे विहित मुदतीत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ