वाडी अदमपुर(ता.तेल्हारा) येथे कलापथकाव्दारे जलजागृती

 




अकोला दि.17(जिमाका)- अकोला सिंचन मंडळ व अकोला पाटबंधारे विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश पाण्याची बचत व पाण्याचा वापर काटकसरीने करणे तसेच पाण्याचे महत्व जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आहे. याकरीता वाडी अदमपुर ता. तेल्हारा येथे शाहीर मधुकर नावकर यांनी पथनाटय व पोवाड्याच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच "पाणी अडवा पाणी जिरवा" हा संदेश लोककलेच्या माध्यामातून नागरिकापर्यंत पोहोचविले. यावेळी कार्यक्रमास उपविभाग कार्यालयाचे प्रमुख श्री. भांगडिया, शाखा अभियंता तसेच उपविभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच वाडी अदमपुर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम