जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कारवाई; बालविवाह थांबविण्यास यश


 

अकोला दि.22(जिमाका)- महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला धाकली येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंजर पोलिस स्टेशनच्या मदतीने सोमवारी(दि.21) बार्शीटाकळी तालुक्याच्या धाकली गावातील 17 वर्षीय बालिकेचा विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

बार्शीटाकळी तालुक्यातील धाकली येथील 17 वर्षीय मुलींचे बालविवाह होत असल्याची माहिती सोमवारी (दि.21) रोजी दुरध्वनीवरुन मिळाली. माहितीच्या आधारे मुलीचे वय 17 वर्ष असल्याचे खात्री केली. त्यानुसार तिच्या नातेवाईकांना मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याने बाल विवाह अधिनियमानुसार विवाह करणे कायदेशीर गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. तसेच तिच्या पालकाकडून 18 वर्षानंतरच मुलीचे विवाह करण्याचे हमी पत्र लिहून घेतले. या कार्यवाहीमध्ये पिंजर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. बंडू मेश्राम,  .पी.आय अजयकुमार वाढवे, हेडकॉन्स्टेबल संतोष हिराळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, सरंक्षण अधिकारी सुनिल सरकटे, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये यांनी कारवाई केली. तर धाकली गावचे पोलीस पाटील कैलाशराव गाळवे, बार्शीटाकळी बालविकास प्रकल्प अधिकारी अर्पणा उगले, योगेंद्र  खंडारे, सतिश राठोड यांनी सहकार्य केले. ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  तसेच अशा प्रकारच्या बालविवाह,  एका वर्षाखालील मुलीवर अत्याचार किंवा बालकांचे अवैध दत्तक देण्याबाबत काही प्रकार आढळल्यास अशा प्रकारची माहिती तात्काळ 1098 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ