कोविडःआरटीपीसीआर व रॅपिडमध्ये शुन्य पॉझिटिव्ह , दोन डिस्चार्ज

अकोला दि.21(जिमाका)- आज दिवसभरातशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)44 अहवालप्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर दोघानाडिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय वशासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.दरम्यान काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाहीअहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळेआता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65176(49169+15035+972) झाली आहे, अशी माहिती शासकीयवैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व खाजगी शून्य) शून्य  + रॅपिड ॲन्टीजेनचाचणी शून्य= एकूणपॉझिटीव्ह 00.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 370469 नमुने तपासण्यातआले. त्यात प्राथमिक तपासणीचे 366362 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते.आजपर्यंत एकूण 370469  अहवालप्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 321300 आहे, अशी माहितीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आरटीपीसीआर ‘शुन्य’ आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात कुणाचाही  अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाकडून प्राप्त झाली.तीनजणांवर उपचार सुरुजिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65176(49169+15035+972)आहे. त्यात 1165 मृत झाले आहेत. तर 64008 जणांना डिस्चार्जदेण्यात आला असून सद्यस्थितीत तीन जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हारुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.रॅपिड ॲन्टीजेन 90चाचण्यांत शून्य पॉझिटीव्हजिल्ह्यात काल (दि. 20 रोजी) रॅपिड ॲन्टीजेनच्या90 चाचण्या राबविण्यात आल्या. त्यात एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलानाही,असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. अकोला मनपा क्षेत्रात 76, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 14 अशा एकूण90 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आलानाही,असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे.00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ