पोस्ट ऑफिसमध्ये कोअर बँकिंग प्रणाली

अकोला दि.२२(जिमाका)- देशातील सर्व पोस्ट ऑफिसेस हे कोअर बॅंकिंग प्रणालीने जोडले जाणार असून पोस्ट खाते धारकांना त्याचा फायदा होईल. तरी पोस्टात बचत करणाऱ्या खातेधारकांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन अकोला विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात देशभरातील १ लक्ष ५० हजारपेक्षा अधिक पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग प्रणालीशी जोडले जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या खातेधारकांना व्यवहार करणे सोपे होणार आहे. देशातील १ लक्ष ५० हजारपेक्षाही अधिक पोस्ट ऑफिस मुलभूत बँकिंग प्रणालीशी जोडले जातील. यामुळे खातेधारक ऑनलाईन व्यवहार स्वतःच करु शकतील. त्यांना सतत पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही. याशिवाय पोस्ट ऑफिस खाते आणि इतर बँकामधील पैशाचे व्यवहार ऑनलाईन हस्तांतरण करणे शक्य होणार आहे. कोअर बँकिंगमुळे नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीम आणि पोस्ट ऑफिस खात्यांचे संचालन सोपे होणार आहे. तसेच पैशाच्या देवाणघेवाणीमुळे शहर व ग्रामीण भागातील शेतकरी आणि जेष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे,असेही कळविण्यात आले आहे. ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम