कोविडःआरटीपीसीआर व रॅपिड अहवाल शुन्य

 अकोला दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 32 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये  कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65179(49169+15038+972) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व खाजगी शून्य) शून्य  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 00.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 371180 तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 367063 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते. आजपर्यंत एकूण 371180 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 322011 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर ‘शुन्य’  

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात कुणाचाही  अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तीन जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65179(49169+15038+972)आहे. त्यात 1165 मृत झाले आहेत. तर 64011 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत तीन जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन 114 चाचण्यांत शुन्य पॉझिटीव्ह

जिल्ह्यात काल (दि. 27 रोजी) रॅपिड ॲन्टीजेनच्या 114 चाचण्या करण्यात आल्या. त्यात कुणाचाही  अहवाल पॉझिटिव्ह आला,असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. अकोला मनपा क्षेत्रात 107 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सात चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अशा एकूण 114 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम