जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; कोविड निर्बंध:सभा, संमेलन, समारंभातील उपस्थिती संख्येवरील मर्यादा हटवली

              अकोला दि.30(जिमाका)-  जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून  दैनंदिन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे गुरुवार दि.31 मार्च पासून कोविड निर्बंधांमध्ये खालील प्रमाणे सवलत देण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात दि.31 मार्चच्या मध्यरात्री पासून  सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, उत्सव, विवाह तसेच इतर मंडळ इ. ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तिंच्या संख्येवर कोणतीही मर्यादा राहणार नाही. मात्र कोविड अनुरुप वर्तनाचे पालन बंधनकारक असेल. मिरवणूक, रॅली इ. बाबत संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे बंधनकारक असेल. ध्वनीक्षेपक, वाद्य इ. बाबतही पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असेल असेही आदेशात म्हटले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ