प्रादेशिक परिवहन विभागाची खाजगी बसेसवर कार्यवाही

 



अकोला दि.17(जिमाका)- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप कालावधीत खाजगी बसेसला प्रवासी वाहतूकीस परवानगी देण्यात आले. खाजगी बसेसव्दारे सणासुदीच्या काळात प्रवाशाकडून मनमानी भाडे आकारुन प्रवाशाची लुट होवू नये याकरीता प्रादेशिक परिवहन विभागाव्दारे मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत खाजगी बसेच्या बुकींग सेंटर व 47 खाजगी बसेसवर धाडी टाकून तपासण्या करण्यात आल्या. त्यात 14 खाजगी बसेस यांना प्रतिवेदन देवून 98 हजार रुपयांचे दंड वसूल करण्यात आले. ही मोहिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरिक्षक संदीप तुरकने व अभिजीत ताले यांनी राबविली.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ