जागतिक महिला दिनःआज महिला रोजगार मेळाव्यात २१४ पदांसाठी होणार निवड; दिवसभर विविध कार्यक्रम, फेसबुकवरुन थेट प्रसारण

             अकोला, दि.(जिमाका)- जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दि. ८ रोजी सकाळी दहा वा.  महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २१४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून  सात कंपन्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे. दरम्यान महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे उद्घाटन सोहळ्याचे फेसबुकवरुन लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे. रोजगार मेळाव्याचा तसेच विविध कार्यक्रमांमध्ये  महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

            कार्यक्रम याप्रमाणे: सकाळी  १० वाजता महिला रोजगार मेळावा कार्यक्रम व प्रदर्शनद्घाटन या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे मार्गदर्शन करतील.

महिला रोजगार मेळाव्यात २१४ पदांसाठी पदभरती

            पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे करण्यात आले असून हा मेळावा फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे.  मेळाव्यात श्री सॉफ्ट टॉईज एमआयडीसी अकोला येथे ३० पदे, शैक्षणिक पात्रता-  दहावी व शिवणकामाचा अनुभव वयोमर्यादा १८ ते ३८वर्षे. लॅबेन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लि. एमआयडीसी अकोला येथे १९ पदे, शैक्षणिक पात्रता-बीएससी, एमएससी, बी फार्म, एम फार्म वयोमर्यादा २० ते ४० वर्षे. धूत ट्रान्समिशन प्रा. लि. पैठण रोड औरंगाबाद येथील ५० पदे, शैक्षणिक पात्रता- १० वी १२वी, किमान कौशल्य वा आयटीआय उत्तीर्णम वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे,  भारतीय विमा निगम, अकोला शाखा २० पदे, किमान १० वी, वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे,  प्रज्ञा शैक्षणिक  आणि सामाजिक बहुउद्देशीय संस्था अकोला ५० पदे, किमान दहावी, वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे,  यश कॉटीयार्न, अकोला, २० पदे, किमा दहावी, वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन नाशिक, २५ पदे, कोणत्याही शाखेतील पदवीधर, वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे. असे २१४ पदांची भरती करण्यासाठी रोजगार मेळाव्यात मुलाखती होणार आहेत.  त्यासाठी इच्छुक महिलांनी  www.rojgara.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर किंवा www.akola.nic या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

विविध कार्यक्रम

याशिवाय महिला दिनानिमित्त विविध माहितीपर कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ११ वाजता महिलांसाठी प्रशासकीय सेवेतील संधी व स्पर्धा परीक्षा याबाबत पोलीस उपअधीक्षक रितू खोकर, लेखाधिकारी रुपाली भुईभार मार्गदर्शन करतील तर मार्केटिग कौशल्य या विषयावर प्रशांत चौधरी, स्वप्निल गावंडे, बँकांची सुलभ कर्ज प्रक्रिया याविषयी कृषी  क्षेत्र अधिकारी पुनम देवाजे, आर्थिक साक्षरता याविषयावर मिनाक्षी तापडीया मार्गदर्शन करतील. दुपारी एक वाजता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग योजनांची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ‍निलेश निकम देतील. दुपारी दिड वाजता .संगिता भाकरे कायदेविषयक मार्गदर्शन करतील, दुपारी दोन वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सिमा तायडे या आरोग्य विषयक मार्गदर्शन करतील तर आहार विषयक मार्गदर्शन मनिषा वराडे व अंजली वाघ करतील. दुपारी चार वाजता ताणतणावापासून मुक्ती या विषयावर सचिन बुरघाटे मार्गदर्शन करतील. दुपारी साडेचार वाजता यशस्वी महिला उद्योजक स्नेहल ढवळे(ढवळे ॲटोमोबाईल) या उपस्थित महिलांशी संवाद साधतील. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल.

‘फेसबुक’वरुन थेट प्रसारण

या कार्यक्रमातील उद्घाटन सोहळ्याचे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे फेसबुकवरुन थेट प्रसारण करण्यात येणार आहे.त्यासाठी https://fb.me/e/5UK9TUeGO या लिंकवरुन सकाळी १० वाजेपासून प्रसारण पाहता येईल.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ