फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

      



      अकोला, दि.१०(जिमाका)- गावोगावी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करुन  त्यांना औषधोपचार देण्यासाठी फिरते रुग्णालय  आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

            येथील रासी बियाणे या बियाणे उत्पादक कंपनीच्या सामाजिक उपयुक्तता निधी अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत फिरता दवाखाना ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतील. शिवाय आवश्यक उपचार व औषधीही असतील. नागरिकांना गावोगावी जाऊन वैद्यकीय चाचण्या व उपचार सुविधा याद्वारे देणे शक्य होणार आहे. आज या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत,  गुणनियंत्रक नितीन लोखंडे,  कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, मोहिम अधिकारी मिलिंद जवंजाळ तसेच दिनेश शहा, मंदार सावजी, मुकेश राठी, दिलीप ठाकरे, पराग छलाणी, जयेश सदावर्ते, रासीचे जिल्हा व्यवस्थापक अनिल माहोरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. मनिष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा फिरता दवाखाना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सेवा देणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल,असे मत यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी व्यक्त केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ