मत्स्यव्यवसाय विभागात डाटा एंट्री ऑपरेटर पदभरती; 14 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


       अकोला, दि. 9(जिमाका)- मत्स्यव्यवसाय विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने एकूण सहा डाटा एंट्री ऑपरेटर पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येणार आहे. नियुक्ती कार्यक्षेत्र अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी राहिल. उमेदवारांनी त्यांचे अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात किंवा ई-मेल द्वारे संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचेकडे सादर करून एक प्रत प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग कार्यालयास व ई-मेलवर पाठवावी. अर्ज करणाची अंतिम दि.14 मार्चपर्यंत आहे. पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी   pmmsy.rdcamravati@gmail.com या मेल आयडी व दुरध्वनी क्रमांक 0721-2662801 वर संपर्क साधवा. पदभरतीकरीता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा,  असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद राठोड यांनी केले.

00000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ