क्रीडा सवलत वाढीव गुण; दि.४ एप्रिल पर्यंत प्रस्ताव मागविले

             अकोला, दि.(जिमाका)- राज्यातील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या तसेच विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर सहभाग असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.सन २०२१-२०२२ शैक्षणिक वर्षातील क्रीडा सवलत वाढीव गुणांचा प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे दि.४ एप्रिल पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

यासंदर्भात  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, क्रीडा सवलतीचे वाढीव गुणासाठी सन २०२१-२२ या वर्षासाठी इयत्ता १० वी परिक्षेस प्रविष्ठ खेळाडू विद्यार्थ्यांस इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वी मधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग व प्रावीण्य विचारात घेतले जाईल. तसेच इयत्ता १२ वी परीक्षेस प्रविष्ठ खेळाडू विद्यार्थ्यांस इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी मधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग व प्रावीण्य विचारात घेऊन सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता क्रीडा सवलतीचे वाढीव गुण दिले जाणार आहे. इयत्ता १२ वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर करतांना इयत्ता १० वी गुणपत्रिका व लाभ घेतलेल्या स्पर्धा प्रमाणपत्राची  छायांकीत प्रत सोबत जोडणे बंधनकारक राहील. खेळाडू विद्यार्थ्यांने इयत्ता १० वी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सवलत वाढीव गुण घेतले असल्यास त्याच खेळ प्रकारातील स्पर्धेच्या जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील प्रमाणपत्रास अतिरिक्त गुणांची सवलत इयत्ता १२ वी मध्ये घेता येणार नाही. त्या व्यतिरिक्त इतर खेळ प्रकार (शासन निर्णयामध्ये नमूद) किंवा इतर स्पर्धा वर्ष (इयत्ता १२ वी करीता इयत्ता ९ वी व १० वी) असल्यास क्रीडा सवलत वाढीव गुणांचा लाभ घेण्यात येईल.

विभागीय शिक्षण मंडळाकडे क्रीडा सवलतीचे वाढीव गुण प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळा / महाविद्यालयांनी क्रीडा सवलत वाढीव गुणाचा अर्ज, परिक्षेचे ओळखपत्र, खेळाचे प्रमाणपत्र, आधारकार्डची झेरॉक्स त्यावर मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित केलेले परिपूर्ण प्रस्ताव तसेच एकविध खेळ संघटनाद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धा या अधिकृत वार्षिक अजिंक्यपद स्पर्धा असणे आवश्यक आहे. अन्य अथवा निमंत्रित स्पर्धांना क्रीडा सवलत वाढीव गुण अनुज्ञेय राहणार नाही. संघटनेमार्फत प्राप्त प्रस्तावातील छायांकित प्रमाणपत्रावर जिल्हा संघटना अध्यक्ष किंवा सचिवांची शाईची स्वाक्षरी व शिक्का बंधनकारक आहे. जिल्हा व विभागस्तरावरील स्पर्धेतील खेळाडूंचे प्रस्ताव ऑफलाईन स्विकारले जातील. राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर स्पर्धेतील खेळाडूंचे प्रस्ताव ऑनलाईन भरून त्याची एक प्रत मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहीत मुदतीत सादर करावी. क्रीडा सवलत वाढीव गुणांचा प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे दि.४ एप्रिल पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. दि.४ एप्रिल नंतर आलेल्या किंवा अपूर्ण क्रीडा सवलत वाढीव गुणांचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. क्रीडा सवलत वाढीव गुणासंबंधी अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ