तालुकास्तरीय कार्यशाळेत बालकांच्या समस्यांवर मार्गदर्शन

 



 

अकोला दि.17(जिमाका)- महिला व बालविकास आयुक्तालय,  महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे व महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापुर तालुक्यात खतीब भवन येथे बुधवारी (दि.16) प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत  अंगणवाडी सेवीका पोलीस पाटील यांना बालकांच्या समस्या, त्याचे अधिकारी व हक्काविषयी मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

या कार्यशाळेत बालकांचे हक्क व अधिकार अबाधित राहावे, ग्रामीण भागात बालकांच्या असणारे विविध समस्यां जसे बालविवाह, बाल लैंगीक अत्याचाराच्या घटना यांना आळा बसावा या करीता महसुली गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्य सचिव अंगणवाडी सेवीका तर पोलीस पाटील हे महत्वाचे सदस्य आहेत.  समितीला अधिक सक्षम व्हावी याकरीता अंगणवाडी सेवीका व पोलीस पाटील यांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षण तालुकास्तरीय कार्यशाळा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली. या कार्यशाळेत 68 अंगणवाडी सेवीका व 37 पोलीस पाटील सहभागी होते. कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. बालविकास प्रकल्प अधिकारी भारती लांडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, अश्विन डाबेराव यांनी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजु लाडुलकर यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री.नितीन अहीर यांनी ग्राम बाल संरक्षण समितीची रचना कार्य, उदेश या बाबत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात माहीती दिली. बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती लांडे  यांनी मिशन वात्सल्य बाबत माहीती दिली . सुनिल लाडुलकर यांनी बालकांसाठी कार्यरत असणारे विवीध यंत्रणाची विस्तृत
माहीती देतांना बाल कल्याण समितीची रचना, बालगृहांची कार्यपध्दती, बालन्याय मंडळ, काळजी
संरक्षणाची गरज असणारी विधी संघर्ष ग्रस्त बालके या वर मार्गदर्शन केले. अश्विन डाबेराव यांनी
कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाबाबत माहीती सांगितली.  महिला बालविकासच्या बालकांसाठी असणारे
विवीध योजनांची माहीती योगेंद्र खंडारे यांनी दिली. चाईल्ड लाईनच्या समन्वयीका हर्षाली
गजभीये यांनी चाईल्ड लाईनची कार्यपध्दती 1098 काय आहे याबाबत माहीती दिली.

कार्यक्रमाचे सुरुवातील उपस्थितांची नोंदणी करण्यात आली नोंदणीचे कार्य सचिन घाटे रेवत
खाडे यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन अहीर आभार प्रदर्शन सतिश राठोड
यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सुनिल सरकटे, संगिता अभ्यंकर,
रेशमा मुरूमकार, बाळापुर पोलीस स्टेशनचे अरूण मदनकार, प्रशांत लोळे यांनी परीश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थीनी या कार्यशाळेबाबत आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ