जागतिक महिला दिनः स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शनही

 



            अकोला, दि.(जिमाका)- महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमात आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास ते व्यवसाय मार्गदर्शन अशा विविध मार्गदर्शनांचा लाभ उपस्थित महिलांना झाला.

उद्घाटन सत्रानंतर महिलांसाठी प्रशासकीय सेवेतील संधी व स्पर्धा परीक्षा याबाबत पोलीस उपअधीक्षक रितू खोकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,आपले उद्दिष्ट आणि ध्येय्य निश्चित करा. त्याच्या पूर्ततेच्या दिशेने प्रयत्न करा. अपयश आले तर हताश न होता अपयशाची कारणे शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न करा.  हे सगळं करतांना आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या, त्यासाठी छंद जोपासा असे त्यांनी सांगितले. लेखाधिकारी रुपाली भुईभार  यांनीही यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनीही स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेत महिला नक्कीच यशस्वी ठरू शकतात असे सांगितले.  अंशूल गुप्ता यांनी घरबसल्या महिला कसे व्यवसाय करु शकतात तसेच  त्यासाठी सोशल मिडीयाचा वापर कसा करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.  तर बँकांची सुलभ कर्ज प्रक्रिया याविषयी कृषी  क्षेत्र अधिकारी पुनम देवाजे, आर्थिक साक्षरता याविषयावर मिनाक्षी तापडीया यांनी महिलांना मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग योजनांची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ‍निलेश निकम यांनी दिली तर ॲ.संगिता भाकरे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सिमा तायडे यांनी महिलांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.  ताणतणावापासून मुक्ती या विषयावर सचिन बुरघाटे यांनीही मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ