पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हादौरा

              अकोला दि.२८(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे मंगळवार दि. 29 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- सकाळी 11 वाजता राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित महिला मेळाव्यास उपस्थिती, स्थळ- स्व. के. आर. ठाकरे सभागृह, कृषी महाविद्यालय, अकोला. दुपारी दोन वा. जिल्हा नियोजन समिती व माविम मार्फत दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- स्व. के. आर. ठाकरे सभागृह, कृषी महाविद्यालय, अकोला. त्यानंतर सवडीने दर्यापूर मार्गे अमरावतीकडे प्रयाण.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ