जलजागृती सप्ताह समारोप:शालेय विद्यार्थांच्या माध्यमातून अविरत सुरु ठेवा ‘जलजागृती’-जिल्हाधिकारी निमा अरोरा






अकोला,दि.२२(जिमाका)- पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करणे;हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. जलजागृतीचे हे ज्ञान शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत नेणे शक्य आहे. त्यामुळे ही ‘जलजागृती’ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अविरत सुरु ठेवावी, त्यासाठी स्पर्धा व शैक्षणिक प्रकल्पांच्या माध्यमातून पाण्याचे महत्व त्यांच्या मनात रुजविण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप पार पडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. चव्हाण, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे, जलसंपदा विभागाच्या श्रीमती महाजन, प्रीती शेंडे आदी उपस्थित होते. पाण्याचे साठे मर्यादित असून त्यांचा वापर योग्य व काटकसरीणे करणे आवश्यक आहे. जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावे याकरीता जलजागृती सप्ताह राबविला जातो. त्याअनुषंगाने जिल्ह्यात दि. १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहात जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. त्यात शहरी व ग्रामीण भागात चित्ररथासव्दारे जनजागृती, पाणी बचतीबाबत चर्चा सत्र, विद्यालयात विद्यार्थ्यांना जलजागृतीबाबत संबोधन, वॉटर रन, रांगोळी व निबंध स्पर्धेव्दारे जलजागृती करण्यात आली, अशी माहिती अ.खु.वसुलकर यांनी प्रास्ताविकातून दिली. जलजागृती सप्ताहात निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सामुहिक जलप्रतिज्ञा झाली. तर हास्यकवी प्रशांत भोंडे यांनी कवितेच्या माध्यमातून पाण्याचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिपीका गावंडे यांनी केले. ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ