कोविडःआरटीपीसीआरमध्ये तीन पॉझिटिव्ह, सात डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन तीन पॉझिटीव्ह


अकोला दि.5(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 143 अहवाल प्राप्त झाले. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच खाजगी लॅब मधून शुन्य असे एकूण तीन आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दिवसभरात सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65155(49153+15035+967) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 3 व खाजगी 0) 03 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 3= एकूण पॉझिटीव्ह 06.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 369083 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 364968 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 369083 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 319930 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर तीन पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तिघांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन स्त्री व एक पुरुषांचा समावेश आहेत. त्यात अकोला ग्रामीण, बार्शीटाकळी व अकोट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे. तर खाजगी लॅबच्या अहवालात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सात जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

19 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65155(49153+15035+967) आहे. त्यात 1165 मृत झाले आहेत. तर 63971 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 19 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 145 चाचण्यात तीन पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.4) दिवसभरात झालेल्या  चाचण्या 145 झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे एक, अकोट येथे 11, बार्शीटाकळी येथे एक, तेल्हारा येथे दोन, मुर्तिजापूर येथे दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 89, जिल्हा आरोग्य कर्मचारी एक चाचणी झाली त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 38 चाचण्या झाल्य त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.असे एकूण 145 चाचण्यात तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ