राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी व्हा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

अकोला दि.21(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया विषयी नागरिकामध्ये जनजागृती व्हावी याकरीता मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत गाणे, व्हिडीओ, पोस्टरची डीझाईन, घोषवाक्य तयार करणे असे उपक्रमाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी होण्याकरीता गुरुवार दि. 31 मार्चपर्यंत अर्ज करावा. तसेच स्पर्धेसंबंधी सविस्तर माहिती https://eciveep.nic.in.contest/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम