पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणाकरीता आर्थिक मदत;अर्ज करण्याचे आवाहन

 

            अकोला,दि. 9(जिमाका)- कोविड महामारीमुळे बालकांनी आईवडील किंवा दोन्ही पालक गमावलेले आहेत अशा 18 वर्षाखालील बालकांच्या शालेय शुल्क, वसतीगृह व शालेय साहित्य खरेदीकरीता आर्थिक मदत दिली जाणार आहे. पात्र गरजू बालकाच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले.

            पालक गमावलेल्या बालकांकरीता महिला व बाल विकास विभागाव्दारे विविध योजनेचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत पालक गमावलेल्या  बालकाच्या आर्थिक मदतीकरीता बाल न्याय निधी उपलब्ध झाला आहे.  या योजनेचा लाभ घेण्याकरीता तालुक्यातील मिशन वात्सलय समितीतील सदस्य सचिव, बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका संरक्षण अधिकारी यांच्याकडे आवश्य कागदपत्रासह अर्ज करावा. जिल्हा कृती दलामार्फत अर्जाची तपासणी करुन गरजु बालकांना लाभ दिला जाणार आहे. बाल न्याय निधीव्दारे कोविडमुळे अनाथ व निराधार झालेल्या बालकांना शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक साहित्यसाठी मदत केली जाणार आहे. त्यामुळे गरजु बालकांनी त्वरीत अर्ज दाखल करावा. अधिक माहितीकरीता जिल्हा बाल संरक्षणक कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अकेाला येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ