नाम फाऊंडेशनचा उपक्रमः शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात 109 महिलांना 27 लक्ष 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

 









अकोला दि.25(जिमाका)- नाम फाऊंडेशनच्या वतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना दिलासा व आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 109 महिलांना 27 लक्ष 25 हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज वितरीत करण्यात आले.  नाम फाऊंडेशनचे हे मदत कार्य नेहमीच उल्लेखनीय आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी नाम फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेश वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नाम फाऊंडेशनचे जिल्हा मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रा. मधु जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर, नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक माणिक शेळके उपस्थित होते. विदर्भ व खान्देशचे समनव्यक तथा दिग्दर्शक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आली.

जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, नाम फाऊंडेशनने ग्रामीण भागात खूप चांगले काम केले असून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदतीमुळे आधार  मिळाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आवश्यक ती सर्व मदत करण्याकरीता प्रशासन आपल्या पाठीशी आहे. याकरीता शेतकरी कुटुंबांनी स्थानिक तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पात्र योजनेचा लाभ प्राधान्याने देण्याचे निर्देश  जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. या कार्यक्रमाद्वारे नाम फाऊंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त 109 कटुंबीयांना प्रत्येकी 25 हजार रुपये प्रमाणे 27 लक्ष 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ