लसीकरणाला उत्स्‍फुर्त प्रतिसाद; 12 ते 14 वयोगटातील एकाच दिवसी 4 हजार 600 मुलांचे लसीकरण

 




अकोला दि.31(जिमाका)- जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून नागरिक व विद्यार्थ्यांच्या उस्त्फुर्त प्रतिसादामुळे आज(दि.31) रोजी  एकूण 20 लक्ष डोसचे टप्पा पार केला आहे. तसेच 12-14 वयोगटातील मुलांचे एकाच दिवसी(दि.31रोजी) 4 हजार 618 पेक्षा जास्त लसीकरण झाले  असल्याची माहिती जिल्हा परिषदचे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी दिली.

 12-14 वयोगटातील विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण वेगाने सुरु असून ज्यानी दुसरा डोस घेणे बाकी आहे त्यांना कॉलिंग सेंटरव्दारे कॉल करून दुसरा डोस घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावी व अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले,  माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, लसीकरण सनियंत्रक उमेश ताठे यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ