नोंदणी व मुद्रांक विभाग;प्रतिक्षा यादी प्रसिद्ध गुरुवार(दि.24) पर्यंत हरकती मागविले

 अकोला दि.17(जिमाका)- सहजिल्हा निबंधक वर्ग-1 नोंदणी व मुद्रांक विभाग तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध झाली आहे. या प्रतिक्षा यादीबाबत आक्षेप/हरकती गुरुवार दि. 24 मार्चपर्यंत लेखी स्वरुपात दाखल करावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागाचे सहजिल्हा निबंधक डी.एस. भोसले यांनी केले आहे.

प्रतिक्षा यादीत पहिला क्रमांकावर सोनी रतन भिसडे, संतोषी माता मंदिर, अकोला यांचे नाव असून याव्यतिरिक्त सहजिल्हा निबंधक वर्ग-1 च्या आस्थापनेवर अनुकंपा नियुक्तीसाठी उमेदवार शिल्लक नाही. प्रतिक्षा यादीबाबत काही हरकती असल्यास  नोंदणी व मुद्रांक विभाग येथे दि. 24 मार्चपर्यंत  हरकती नोंदवावे. मुदतीनंतर प्राप्त आक्षेप/हरकतीचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ