जलजागृती सप्ताहानिमित्त जागर;आजपासून प्रारंभ

            अकोला,दि.१५(जिमाका)-  पाटबंधारे विभागाच्या वतीने बुधवार दि.१६ ते  मंगळवार दि.२२ या सप्ताहात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता अ. खु. वसुलकर यांनी केले आहे.

या सप्ताहाचे उद्घाटन बुधवार दि.१६ रोजी सकाळी १० वा. नियोजन भवन येथे होणार आहे. यावेळी जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथास हिरवी झेंडीही दाखवण्यात येईल. गुरुवार दि.१७ रोजी वान प्रकल्प लाभक्षेत्रातील वाडी अदमपूर येथे पाणी बचतीबाबत चर्चा सत्र, तसेच अकोला शहरातील विविध विद्यालयात विद्यार्थ्यांना जलजागृतीबाबत संबोधन, शुक्रवार दि.१८ रोजी मुर्तिजापूर तालुक्यात चित्ररथाद्वारे जनजागृती, शनिवार दि.१९ रोजी  काटेपूर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील मौजे अन्वी मिर्जापूर या गावात पाण्याचे महत्त्व व पाणी टंचाईबाबत चर्चा सत्र,  रविवार दि.२० रोजी सकाळी  सात वा.  नेहरू पार्क अते तुकाराम चौक व परत अकोला सिंचन मंडळ कार्यालय, अशी वॉटर रन,  सोमवार दि.२१ रोजी जलसंवर्धन या विषयावर जलपूर्णा परिसर, मुर्तिजापूर रोड, अकोला येथे रांगोळी स्पर्धा,  तसेच मोर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पाण्याचे नियोजनन व जलसंवर्धन या बाबत चर्चा सत्र,  मंगळवार दि.२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे समारोप.

या प्रमाणे सप्ताहभर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता वसुलकर यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ