१२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य व शालेय शिक्षण विभागाने संयुक्त नियोजन करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश




अकोला दि.२२(जिमाका)- जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. सध्या शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार, वयवर्षे १२ ते १४ या वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. या लसीकरणाला गती यावी यासाठी आरोग्य विभाग व शालेय शिक्षण विभागाने तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले. जिल्हा कोविड संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. मनिष शर्मा, डॉ. विजय चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. वैशाली ठग तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या निर्देशानुसार विविध वयोगटानुसार करावयाच्या कोविड लसीकरणासाठी जिल्ह्यात १५ लक्ष २८ हजार १५ इतके उद्दिष्ट असून आता पर्यंत पहिला डोस ११लक्ष ८९ हजार ३८३ जणांचा (७७.८४%) झाला आहे. दुसरा डोस ७ लक्ष ७७ हजार १९९ (५०.८६%) झाला आहे. तर आतापर्यंत १४ हजार ६७५ जणांचा बुस्टर डोस घेऊन झाला आहे, अशी माहिती बैठकीत सादर करण्यात आली. जिल्ह्यात लसीकरणासाठी वयोगटानुसार नियोजित लाभार्थ्यांची संख़्या या प्रमाणे आहे. १२ ते १४ वर्षे- ६१ हजार, १५ ते १७ वर्षे-९५ हजार १५, १८ ते ४४ वर्षे-८ लक्ष ८१ हजार ८००, ४५ ते ५९ वर्षे-३ लक्ष २३ हजार १००, ६० वर्षावरील २ लक्ष २८ हजार १००. लसीकरणास गती देण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थी हे शाळकरी विद्यार्थी असून शाळानिहाय तसेच त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेऊन त्यांचे लसीकरणाचे नियोजन करण्यात यावे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांमधील शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांचे बुस्टर डोस पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी यावेळी दिले. ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ