कोविडःआरटीपीसीआर व रॅपिडमध्ये शुन्य पॉझिटिव्ह , एक डिस्चार्ज
अकोला दि.23(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 170 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही,
तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.22) रॅपिड
ॲटीजेन टेस्ट मध्ये
कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण
संख्या 65176(49169+15035+972) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व
खाजगी शून्य)
शून्य + रॅपिड ॲन्टीजेन
चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह 00.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 370749 तपासण्यात
आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 366632 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 3707 नमुने होते. आजपर्यंत एकूण 370749 अहवाल प्राप्त झाले
आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 321580 आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर ‘शुन्य’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
एकाला डिस्चार्ज
आज दिवसभरात होम
आयसोलेशन येथून एकाला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
दोन जणांवर उपचार
सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65176(49169+15035+972)आहे. त्यात 1165 मृत झाले
आहेत. तर 64009 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत दोन जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन 139 चाचण्यांत
शून्य पॉझिटीव्ह
जिल्ह्यात काल (दि. 22 रोजी)
रॅपिड ॲन्टीजेनच्या 139 चाचण्या राबविण्यात आल्या. त्यात एकाचाही
अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. अकोट येथे एक, मुर्तिजापूर
येथे दोन, अकोला मनपा क्षेत्रात 106, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात 30 अशा एकूण 139 जणांच्या
चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालयातून
कळविण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा