आधार कार्ड मोबाईल क्रमांक जोडण्याकरीता विशेष मोहिम

 

अकोला दि.24(जिमाका)- आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडणे आवश्यक असून अद्यापही जिल्‍ह्यातील बहुतांश नागरिकांनी मोबाईल क्रमांक जोडणे बाकी आहे. आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडणे आवश्यक असून जिल्ह्यातील  सर्व नागरिकांनी आपला आधार कार्ड मोबाईल क्रमांकांशी जोडावे, असे आवाहन भारतीय डाक विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.  

आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडण्‍याचे फायदे

1)      केंद्र व राज्य शासनाच्‍या विविध योजनांसाठी आधारमध्‍ये मोबाईल नंबर अद्यावत असणे आवश्‍यक आहे.

2)   वाहन परवाना, आयकर परतावा, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, प्रधानमंत्री मातृत्व वंदना, घरकुल योजना, निराधार योजना, फसल विमा योजना या सारख्‍या अनेक योजनासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमाकांशी अद्यावत असणे आवश्‍यक आहे.

3)   31 मार्च पूर्वी आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडले तर, भविष्‍यात सरकारी लाभ मिळण्‍यास अडचणी येणार नाहीत.

4)  भारतीय डाक विभागामार्फत संपूर्ण जिल्‍ह्यामध्‍ये वेगवेगळया ठिकाणी आधार कार्डला मोबाईल क्रमांक दि. ३१मार्चपर्यंत जोडण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

5)  गावामध्‍ये किंवा विशिष्‍ट भागात एकत्रीतपणे 1 हजार लोकांपेक्षा जास्‍त नागरिकांना आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करावयाचे असल्‍यास डाक विभागा मार्फत विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात येईल.

6)   आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न करण्याकरीता आधार कार्ड, संबंधित मोबाइल व पन्नास रुपये फी सोबत आणावे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ