मूर्तिजापुर 51 तर बाळापूरचे 27 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित
अकोला,दि.3 (जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक
निवडणुकांकरीता प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभाग रचना (नमुना ब) कार्यक्रमानुसार मुर्तिजापूर व बाळापूर तालुक्यातील संबंधित ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक, संबंधित तलाठी, तहसील
कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारुप प्रभाग रचनावर हरकती किंवा सूचना आक्षेप दाखल करावयाचा असल्यास त्या लेखी स्वरुपात तहसीलदार
कार्यालय, मुर्तिजापूर व बाळापूर यांचेकडे शुक्रवार दि. 4 मार्च रोजी दाखल करावे, अशी
माहिती मुर्तिजापूर व बाळापूरचे तहसिलदार यांनी दिली.
मुर्तिजापूर
तालुक्यातील प्रभाग रचना याप्रमाणे: विरवाडा, मुंगशी, सांगवा (मेळ), दातवी, शेलु (नजीक), दताळा, रेपाडखेड, जांभा खुर्द, जांभा बु.,
समशेपूर, सालतवाडा, सोनोरी(मुर्तिजापुर), खापरवाडा, दापुरा, कोळसरा, येंडली, सांजापूर (हिरपूर), ब्रहयी( खुर्द), बोर्टा, लोणसना, हिवरा (कोरडे), माना, पोही, रामटेक, नवसाळ, मंदुरा, खोडद, मधापुर, वडगांव, राजनापूर( खिनखिनी),
आकोली (जहॉ), राजुरा(सरोदे),
बोरगांव(निंघोट), वाई (माना), रंभापूर,
नागोली, जितापूर(खेडकर),
खरब (नवले), सोनाळा, दहातोंडा, मुरंबा, आरखेड, उमरी, शिवण खुर्द, बिडगाव, मोझर, कानडी, धोत्रा(शिंदे), धानोरा (वैध), शेरवाडी व भगोरा.
बाळापूर तालुक्यातील प्रभाग रचना याप्रमाणे: कोळासा, कारंजा रमजानपुर, मोरगाव सादीजन, बहादुरा, कळंबी
महागाव, निंबी, सागद, वझेगांव, मांडवा-बु, सांगवी
जोमदेव, बारलींगा, शेळद, सातारगाव, कुपटा, नागद,
हसनापुर, कळंबा बु, तामशी,
जोगलखेड, भरतपुर,
मनारखेड, टाकळी निमकर्दा, मोखा, दधम,
टाकळी खोजबोड, मोरझाडी व व्याळा.
0000000
वृत्त क्रमांक-224
जिल्ह्यातील जमावबंदी व
संचारबंदी रद्द;
जिल्हाधिकाऱ्यांचे
आदेश
अकोला,दि.3(जिमाका)- मदत व पुनवर्सन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कोव्हिड-19 च्या रुग्णामध्ये घट
होत असल्याने इतर निर्बंध कायम ठेवून दिवसाचे जमावबंदी व रात्रीची संचारबंदी रद्द
करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले आहे.
आदेश
याप्रमाणे : फौजदारी
प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार लावण्यात आलेले सकाळी
पाच ते रात्री 11 चे जमावबंदी व रात्री 11 ते सकाळी पाच वाजेपर्यंतचे
संचारबंदीचे आदेश रद्द करण्यात आले आहे. सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक,
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, उत्सव, विवाह आणि इत्तर मेळावे आणि
मंडळाशी संबंधित कोणत्याही संमेलनात किंवा मंडळांमध्ये एकूण उपस्थिती, स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के किंवा 200 यापैकी जी कमी असेल तितकी मर्यादित असेल.
वरील आदेश गुरुवार दि. 3 मार्चपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहिल.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा