कोविडःआरटीपीसीआर व रॅपिडमध्ये शून्य पॉझिटिव्ह

     अकोला दि.१५(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ११२ अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही असे, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.१४) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५१७४(४९१६७+१५०३५+९७२) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शून्य व खाजगी शून्य) शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी = एकूण पॉझिटीव्ह ००.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३७००१८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६५९०१ फेरतपासणीचे ४१० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३७०७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३७००१८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३२०८५१ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर शून्य’  

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तिघांना डिस्चार्ज

आज दिवसभरात तिघा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

१२ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५१७४(४९१६७+१५०३५+९७२)आहे. त्यात ११६५मृत झाले आहेत. तर ६३९९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १२ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन १३६ चाचण्यांत शून्य पॉझिटीव्ह

जिल्ह्यात काल (दि.१४ रोजी) रॅपिड ॲन्टीजेनच्या १३६ चाचण्या राबविण्यात आल्या. त्यात एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. अकोला मनपा क्षेत्रात ११७, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९ अशा एकूण १३६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ