अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

अकोला दि.9(जिमाका)-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये पहिली व दुसरीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज शुकवार दि. 25 फेब्रुवारीपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत विनामुल्य मिळतील. इच्छुक प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी जास्तीत जास्त अर्ज करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.  

प्रवेश अर्ज सादर करताना कोणत्याही भुलथापांना बळी पडता तसेच कोणाच्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करावा.

प्रवेशाकरीता अटी शर्ती याप्रमाणे:

1.      योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.

2.      पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत.

3.      विद्यार्थी दारीद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा.

4.    योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाखच्या आत असणे आवश्यक आह.(तहसिलदाराचे)

5.    इयत्ता पहिली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्ष पुर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल.

6.      योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र दोन पासपोर्ट फोटो जोडावे.

7.   आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा,घटस्फोटित,निराधार,परितक्त्या दारिद्र रेषेखालील कुटूंबातील अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.

8.     विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल.

9.       योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र जोडावे.

10.   वर्ग दुसरीमध्ये शिकत असलेल्या शाळेमध मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी.

11.   अपुर्ण कागदपत्र तसेच खोटी माहीती सादर केल्यास प्रवेश द्द करण्यात येईल.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ