कोविडःआरटीपीसीआरमध्ये 89 पॉझिटिव्ह, 295 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 10 पॉझिटीव्ह
अकोला दि.4(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)
415 अहवाल प्राप्त झाले. त्यात 77 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी
लॅब मधून 12 असे एकूण 89 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 295 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. त्यामुळे
आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64566(48772+14932+862) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 77 व खाजगी 12) 89 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी
10 = एकूण पॉझिटीव्ह 99.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 362971
नमुने
तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 358879 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 3682 नमुने होते. आजपर्यंत एकूण 362971 अहवाल प्राप्त झाले
आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 314199 आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर 89 पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआरचाचण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 77 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात 45 पुरुष, 32 स्त्री
रुग्ण आहेत. त्यातील 28 जण हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील
सात, पातूर येथील आठ, मुर्तिजापूर येथील 15, बार्शीटाकळी येथील दोन, बाळापूर
येथील चार, तेल्हारा येथील 11, अकोट येथील दोन रहिवासी
आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
295 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 295 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
899 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64566(48772+14932+862)
आहे. त्यात 1162 मृत झाले आहेत. तर 62505 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून
सद्यस्थितीत 899 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 374 चाचण्यात 10 पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.3) दिवसभरात झालेल्या 374 चाचण्या झाल्या
त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 11, बाळापूर येथे दोन, पातूर येथे
एक, तेल्हारा येथे पाच, मुर्तिजापूर येथे पाच, अकोला महानगरपालिका
क्षेत्रात 305 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोला येथे तीन चाचण्यात एक, बार्शीटाकळी
येथे तीन चाचण्यात एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 35 चाचण्यात सहा, हेडगेवार
लॅब येथे चार चाचण्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 374 चाचण्यात 10 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा