युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांकरीता प्रशासनाशी संपर्क साधा

 

अकोला, दि.24(जिमाका)- रशिया व युक्रेन या देशामध्ये तणावपुर्ण परीस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील नागरीक अडकले असल्यास तात्काळ नागरीकांचे नातेवाईकांनी जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यानुसार प्रवाशी, विद्यार्थी, पर्यटक यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल. जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 0724-2424444 वर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा