कोविडःआरटीपीसीआरमध्ये पाच पॉझिटिव्ह, सहा डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन एक पॉझिटीव्ह


अकोला दि.27(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)  225 अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच खाजगी लॅब मधून एक असे एकूण पाच जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दिवसभरात सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65140(49144+15032+964) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 4 व खाजगी 1) 05 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 1= एकूण पॉझिटीव्ह 06.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 368374 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 364259 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 368374 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 319230 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर पाच पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन स्त्री, दोन पुरुष रुग्ण आहेत. त्यातील अकोला शहरातील दोन, पातूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तर खाजगी लॅबच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सहा जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

53 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65140(49144+15032+964) आहे. त्यात 1164 मृत झाले आहेत. तर 63923 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 53 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 133 चाचण्यात एक पॉझिटीव्ह

            कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.26) दिवसभरात 133  चाचण्या झाल्या त्यात एकाचा  अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे चार, बार्शीटाकळी येथे एक, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 95, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 31 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 133 चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ