पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा: पाणंद रस्त्यांच्या कामांना गति द्या- ना. बच्चू कडू




 अकोला, दि.८(जिमाका)- जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामांना गति द्यावी व शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन द्यावी,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील पाणंद रस्ते विकास कामांबाबत त्यांनी आढावा घेतला. पालकमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. त्यात  दिव्यांगांना स्वयंरोजगार,  पाणंद रस्ते विकास आराखडा,  वाबळेवाडी शाळा पॅटर्नप्रमाणे प्रत्येक तालुक्यात एक शाळा विकसित करणे,  आदिवासी विकास विभागामार्फत राबवावयाच्या योजना,  क्रीडा सुविधा विकास, आरोग्य विभाग, सुपरस्पेशालिटी रुग्णालय आढावा, रुग्णालयातील सफाई कर्मचारी, मनपा सफाई कर्मचारी , मोर्णा नदी स्वच्छता अभियान अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ