‘न्याय्यपशुवैद्यकशास्त्र दृष्टीने पशुशवविच्छेदन’, याविषयावर ऑनलाईन प्रशिक्षण: देशभरातील १८८ पशुवैद्यकांचा सहभाग

 


अकोला, दि.१४(जिमाका)- वेगवेगळ्या जंगली व पाळीव प्राण्यामधील मृत्यूचे नेमके कारण काय? व व्हेटेरोलिगल (न्यायालयासंबंधी) प्रकरण मधील पशुवैद्यकांना येणारे अडथळे ह्या विषयी पशुवैद्यकास अद्यावत ज्ञान व सविस्तर माहिती मिळावी करिता स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने पाच दिवसीय (दि.८ ते १२ दरम्यान) ऑनलाइन राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमास देशभरातील १८८ पशुवैद्यकांनी सहभाग नोंदविला.

 

प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर चे अधिष्ठाता व संचालक शिक्षण डॉ. शिरीश उपाध्ये यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी, विद्यापिठाचे संशोधन संचालक  डॉ. नितीन कुरकुरे व विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य मा. डॉ. संदीप इंगळे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. 

डॉ. उपाध्ये यांनी प्रशिक्षणार्थ्याशी सवांद साधला. ते म्हणाले की, पूर्वी  वेगवेगळ्या प्राण्यांचे शवविच्छेदन करतांना पशुवैद्यकास बऱ्याच अडचणीना तोंड द्यावे लागत असे परंतु अलीकडे नवीन तंत्रज्ञानामुळे छोट्या उतीच्या तुकड्यापासून सुद्धा रोगनिदान करणे शक्य झाले आहे.

प्रा. डॉ. नितीन कुरकुरे, डॉ. संदीप इंगळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात देशातील वेगवेगळ्या राज्यातील तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या प्राण्यातील जसे गुरेढोरे, शेळयमेंढया, जंगली प्राणी व पक्षी, प्रयोगाकरिता वापरण्यात येणारे प्राणी  यांमध्ये शवविच्छेदन करण्याचे पद्धती, विविध रोगामध्ये दिसणाऱ्या निरनिराळ्या जखमा, शवविच्छेदन अहवाल लिहणे, न्यायालयासंबंधित शवविच्छेदन प्रकरणे, रोगनिदानात शवविच्छेदनाचे महत्व, रोग निदानाच्या विविध पद्धती  याबाबत  मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात वेगवेगळ्या राज्यातील १८८ पशुवैद्यक प्रशिक्षणार्थीनी उस्फूर्त भाग घेतला. 

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संचालक विस्तार माफसू नागपुर डॉ. अनिल भिकाने यांनी शवविच्छेदन हे रोगनिदान करण्यास मदत होते व त्यामुळे उर्वरित पशुंचे औषध उपचार करून जीव वाचविणे शक्य होते,असे सांगितले. अध्यक्ष  प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी नवीन पशुवैद्यकाकरिता या प्रशिक्षणातून देण्यात आलेली उपयुक्त माहिती पशुंचे आरोग्य जपण्याकरिता वापरावी, असे मत व्यक्त केले. सांगता कार्यक्रमात देशातील विविध भागातील प्रशिक्षणार्थीनी दिले गेलेल्या प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

प्रास्ताविक प्रशिक्षण समन्वयक डॉ. रणजीत इंगोले यांनी केले. सूत्र संचालन डॉ. भूपेश कामडी तर आभार डॉ. जी. आर. गंगणे यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक पी. करुणानिधी व डॉ. संतोष शिंदे यांनी वेब समन्वयक हे होते. तर यशस्वी आयोजनासाठी डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. प्रमोद मेश्राम, डॉ. माधुरी हेडाऊ, डॉ. संभाजी चव्हाण, डॉ. सुनील हजारे, डॉ. मंगेश वडे, डॉ. ज्ञानेश्वर काळे व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ