नागरी क्षेत्रातील दिव्यांगांना ॲपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन
अकोला, दि.15(जिमाका)- जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील दिव्यांगांचे सर्व्हेक्षण सुरु असून दिव्यांगांनी मोबाईल ॲपद्वारे आपली नोंदणी करावि असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
दिव्यांगांसाठी
राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत
पोहोचविण्यासाठी प्रशासनातर्फे माहिती संकलन सुरु आहे. त्यासाठी दिव्यांग सर्व्हे
अकोला (Divyang Survey Akola) हे मोबाईल ॲप
सुरु केले आहे. हे ॲप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन दिव्यांग आपली माहिती आपल्या
मोबाईलवर वा मोबाईल नसल्यास घरातील कुणाही व्यक्तिच्या मोबाईलवरुन भरुन आपली
नोंदणी करु शकतात. तरी जिल्ह्यातील नागरी भागातील दिव्यांगांनी आपली नोंदणी
करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी केले आहे.
०००००
Sharda gulabraov manatkar
उत्तर द्याहटवा