ऊर्जा मंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 25(जिमाका)- राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे रविवार दि. 27 व सोमवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि. 27 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बोरगाव येथे आगमन व बोरगाव मंजू येथील महावितरणच्या 2x5 एमव्हीए उपकेंद्राचे लोकार्पण तसेच बोरगाव मंजू येथील कार्यक्रमातून कोथळी व घोटा येथील महावितरणच्या 2x5 एमव्हीए उपकेंद्राचे व्ही.सी. व्दारे लोकार्पण. सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अकोला येथे आगमन व पुतळ्यास माल्यार्पण कार्यक्रम. सायंकाळी पावणेसात वाजता शासकीय विश्रामधाम अकोला येथे आगमन व राखीव.

सायंकाळी सात वाजता अकोला शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांच्या समवेत  तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद व त्यानंतर रात्री शासकीय विश्रामधाम अकोला येथे मुक्काम.

सोमवार दि. 28 रोजी सकाळी साडेनऊ वाजता अकोला येथून व्याळा जि. अकोलाकडे प्रयाण. पावणेनऊ वाजता व्याळा येथे आगमन व श्री. उज्जल आंभोरे जिल्हाअध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम यांच्याकडे राखीव. सकाळी 10 वाजता व्याळा येथून पारस औष्णीक विद्युत केंद्राकडे प्रयाण. सव्वादहा वाजता पारस औष्णीक विद्युत केंद्र येथे आगमन व पारस औष्णीक विद्युत केंद्र तसेच अकोला, वाशिम जिल्ह्यातील उर्जा विभागाची आढावा बैठक. सकाळी सव्वा अकरा वाजता अकोला येथुन कळंबा कसुरा ता.बाळापूरकडे प्रयाण. सकाळी पावणेबारा वाजता कळंबा कसुरा ता.बाळापूर येथे आगमन व कळंबा कसुरा व येथूनच कंळबा कसुरा ता.बाळापूर, मुंडगाव ता.अकोट व वडाळी देशमुख ता.अकोट येथील महावितरणच्या एचव्हीडीएस योजनेअंतर्गत 33/11 के.व्ही. च्या 1x5 एमव्हीए उपकेंद्राचे दुरदृश्य प्रणालीव्दारे उद्घाटनास उपस्थिती. दुपारी पाऊण वाजता कळंबा कसुरा येथून निंबा फाटा मार्गे खामगांवकडे प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ