ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन क्रमांक 14567; सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, दि.24(जिमाका)- ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविणे तसेच त्यांची काळजी घेणे यासाठी  राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567 सुरु करण्यात आला असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन पातुर येथील तहसिलदार दिपक बाजड यांनी केले आहे.

सामाजिक न्याय आणि सबलीकरण  मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे.  ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचार ग्रस्त वृद्धांची काळजी घेणे, आपल्या जवळपासच्या ज्येष्ठांना मदतीची आवश्यकता असल्यास हेल्पलाईन क्रमांक 14567 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ