कोविडःआरटीपीसीआरमध्ये पाच पॉझिटिव्ह, 10 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन शुन्य पॉझिटीव्ह


अकोला दि.23(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 180 अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच खाजगी लॅब मधून एक असे एकूण पाच जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दिवसभरात 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65116(49128+15029+959) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 4 व खाजगी 1) 05 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 05.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 367614 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 363499 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 367614 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 318486 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर पाच पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष, तीन स्त्री रुग्ण आहेत. त्यातील दोन अकोला शहरातील तर मुर्तिजापूर येथील दोन रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

10 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

118 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65116(49128+15029+959) आहे. त्यात 1164 मृत झाले आहेत. तर 63834 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 118 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 144 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

            कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.22) दिवसभरात 144  चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोट येथे 16, मुर्तिजापूर येथे दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 75, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49, हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. असे एकूण 144 चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ