जिल्ह्यातील 30 रेती/वाळु घाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेला शनिवार(दि.5)पर्यंत मुदतवाढ

 अकोला,दि.31(जिमाका)- महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय दि. 28 जानेवारी 2022 नुसार सुधारित वाळू/रेती धोरण जाहिर झाले आहे. सुधारित धोरणानुसार नवीन अर्जदारांना संधी मिळावी याकरीता जिल्ह्यातील 30 रेती/वाळु घाटांच्या ऑनलाईन ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ देवून शनिवारी दि. 5 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

सुधारित वाळु/रेती धोरणाच्या तरतुदीनुसार वाळुचे स्वामित्वधन सहाशे रुपये प्रति ब्रास नुसार ठरविण्यात आली आहे. तसेच नवीन अर्जदारांना संधी मिळावी याकरीता ऑनलाईन ई-निविदाची मुदत वाढवून शुक्रवार दि. 4 फेब्रुवारीपर्यंत  तर ऑनलाईन ई-लिलाव शनिवार दि. 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. यापुर्वी जुना बाईडींग फार्म(biding form) रद्द करुन नवीन बाईडींग फार्म अपलोड करण्यात येणार आहे व त्यानुसार सन 2021-22 करीता जिल्ह्यातील 30 रेती/वाळु घाटांकरीता ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

सुधारित वेळापत्रक याप्रमाणे :

  1. बुधवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता निविदाधारकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे बंद होईल.
  2.  शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ऑनलाईन ई-निविदा भरणे बंद होईल.
  3. शनिवार दि. 5 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन लिलाव सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत सुरु राहिल. लॉट नं.1 चे रेती घाट क्रमांक 1 ते 15 चे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लिलाव. दुपारी एक वाजता ई-लिलाव प्रक्रिया बंद होण्याआधी बोली प्राप्त झाल्यास 10 मिनीटाकरीता तीन वेळा ई-लिलाव प्रक्रियेची वेळ वाढविण्यात येईल. लॉट नं. 2 च्या घाट क्रमांक 16 ते 30 करीता दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत लिलाव. दुपारी चार वाजता ई-लिलाव प्रक्रिया बंद होण्याआधी बोली प्राप्त झाल्यास 10 मिनीटाकरीता तीन वेळा ई-लिलाव प्रक्रियेची वेळ वाढविण्यात येईल.
  4. शनिवार दि. 5फेब्रुवारी रोजी ऑनलाईन प्राप्त ई-निविदा दुपारी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे डाऊनलोड करुन उघडण्यात येतील. ई-निविदा आणि ऑक्शन यामध्ये जी किंमत जास्त असेल त्यास लिलाव मंजूर करण्यात येईल, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना