शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रोजगार मेळावा

 अकोला दि.25(जिमाका)-  औद्योगिक  प्रशिक्षण संस्था मे सुझुकी मोटर्स गुजरात प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार भरती मेळावा आयोजीत केला आहे. हा मेळावा गुरुवार दि.3 मार्च रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे होणार आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अशंकालिन प्राचार्य यांनी केले.

मेळाव्यामध्ये फीटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, डीझेल मेकॅनिक, पेन्टर जनरल, मशिनिष्ट, मोटार मेकॅनिक, टुल ॲन्ड डायमेकर, पि.पि., ट्रॅक्टर मेकॅनिक, सि... ऑटोमोबाईल या व्यवसायातील आय.टी.आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित कंपनीमार्फत रोजगार प्राप्त होणार आहे. मेळाव्यासंबंधी अधिक मार्गदर्शनासाठी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ