युक्रेनमध्ये असलेले जिल्ह्यातील चार विद्यार्थी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात ; आणखी कुणी असल्यास नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन

  अकोला, दि.25(जिमाका)- रशिया व युक्रेन या देशामध्ये तणावपुर्ण परीस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप जिल्ह्यातील चार विद्यार्थी युक्रेन मध्ये असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे.त्यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्कही झाला आहे.तथापि, आणखी कुणी जिल्ह्यातील व्यक्ती युक्रेन मध्ये अडकले असल्यास त्यांच्या स्थानिक नातेवाईकांनी जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील चार विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आहेत. त्यामध्ये मोहित मळेकर, हसन उल्ला खान, प्राप्ती भालेराव व जॅक निक्सोन या विद्यार्थ्यांशी संपर्क झाला आहे. या विद्यार्थ्यांची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मार्फत केंद्र शासनास कळविण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. तसेच  केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली  येथील संपर्क क्रमाक 011-2312113/23014105/23017905, टोल फ्री क्रमांक 1800118797 ई-मेल situationroom@mea.gov.in आहे. तर जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 0724-2424444 वर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ