कोविडःआरटीपीसीआरमध्ये पाच पॉझिटिव्ह, ३४ डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन एक पॉझिटीव्ह

अकोला दि.२०(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ११२ अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.खाजगी लॅब मधून एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला  तर  जणांना ११ डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.१९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५०८३(४९१००+१५०२+९५) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. ४ व खाजगी १) ५ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह सहा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३६७०२४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६२९१२ फेरतपासणीचे ४१० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३७०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३६७०२४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३१७९२४आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर पाच  पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष, तीन स्त्री रुग्ण आहेत.  त्यातील एक अकोट येथील, एक जण मुर्तिजापूर येथील तर उर्वरित दोघे जण हे अकोला शहरातील आहेत. खाजगी लॅबच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

११ जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

१६० जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५०८३(४९१००+१५०२+९५) आहे. त्यात ११६४ मृत झाले आहेत. तर ६५०८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १६० जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः १४५ चाचण्यात एक पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१९) दिवसभरात झालेल्या १४५ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 

 काल दिवसभरात अकोला ग्रामिण येथे एक, अकोट येथे सात, मुर्तिजापूर येथे दोन तर अकोला महानगरपालिका क्षेत्रात १०९, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ व हेगडेवार लॅब येथे एक चाचणी झाली.  त्यात हेडगेवार लॅब येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.असे एकूण १४५ चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ