ध्वनी मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला,दि.1 (जिमाका) - ध्वनी
प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी प्रस्तावित केल्यानुसार ध्वनी मर्यादा शिथील
ठेवण्याचे दिवस निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ध्वनीची विहीत मर्यादा राखून
सन 2022 वर्षाकरीता निश्चित केलेल्या दिवस सकाळी सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक
व ध्वनीवर्धक यंत्रंचा वापर करण्याची परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा
यांनी निर्गमित केले आहे.
ध्वनी
मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस: शनिवार
दि. 19 फेब्रुवारी शिवजयंती, गुरुवार दि. 14
एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रविवार दि. 1 मे महाराष्ट्र
दिन, गणपती उत्सवाचे चार दिवस- दि.
1 सप्टेंबर दुसरा दिवस, दि.4 सप्टेंबर पाचवा
दिवस, सोमवार दि. 5 सप्टेंबर गौरी विसर्जन, शुक्रवार दि.9 सप्टेंबर
अनंत चतुर्दशी, नवरात्री उत्सव दोन
दिवस सोमवार दि. 3
ऑक्टोबर अष्टमी व मंगळवार दि. 4 ऑक्टोबर रोजी नवमी, रविवार दि. 9
ऑक्टोबर ईद-ए-मिलाद, सोमवार दि. 24
ऑक्टोंबर दिवाळी, रविवार दि.
25 डिसेंबर रोजी ख्रिसमस, शनिवार दि. 31
डिसेंबर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा