दिव्यांगाच्या कल्याणासाठी सर्व विभागाने प्राधान्याने काम करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

 



 अकोला, दि.14(जिमाका)- जिल्ह्यात दिव्यांगाकरीता दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात येणार असून या ठिकाणी दिव्यांगाना मार्गदर्शन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. तसेच शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ सर्व विभागाने प्राधान्याने दिव्यांगापर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

दिव्यांगाच्या कल्याव स्वयंरोजगारासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे कृती आराखडाबाबात आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे, नगर प्रशासनाच्या सुप्रिया टवलारे, महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयक वर्षा बनसोड तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, ग्रामीण भागातील सर्वेक्षण पुर्ण झाले  असून शहरातील सर्वेक्षण पुर्ण करुन अहवाल सादर करा. तसेच सर्व यंत्रणेनी दिव्यांगाकरीता असलेले तीन टक्के आरक्षणाचा आढावा घेवून त्यांना आरक्षणाचा लाभ द्या. दिव्यांगाना त्याच्या पात्रतेनुसार प्रशिक्षीत करुन त्यांना रोजगार प्राप्त होईल याकरीता प्रयत्न करा. लवकरच दिव्यांगाकरीता स्वतंत्र्य कक्ष स्थापना करण्यात येणार असून या ठिकाणी त्यांच्या संबंधित योजना, मार्गदर्शन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. याकरीता प्रशासनाने तातडीने कामे पार पाडावी, असे निर्देशही यावेळी दिले.

दर महिन्यात होणाऱ्या लोकशाही दिनासोबतच दिव्यांग लोकशाही दिन घेण्याचे निर्देश यावेळी दिले. जिल्ह्यातील दिव्यांगाना शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनेचा लाभ मिळवून द्या. याकरीता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाच्या घरापर्यंत जावून मदत करा. तसेच सर्व विभागाने दिव्यांगाच्या कल्याणकरीता एका वर्षाचा आराखडा तयार करुन दिव्यांगाच्या कल्याणासाठी योजना राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ