प्रलंबित जात प्रमाणपत्रांची पुर्तता 23 फेब्रुवारीपर्यंत करा; जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन


अकोला, दि.10(जिमाका)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्‍था(बार्टी) पुणे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्‍याच्‍याचे निर्देशीत केले आहे.  त्यानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेल्‍या अर्जदारांनी त्रुटीचे एम.एस.जी पत्रे प्राप्‍त होवुनही त्रुटीची पूर्तता केलेली नाहीत अशा अर्जदारांनी बुधवार दि. 23 फेब्रुवारीपर्यत त्रुटीची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्‍हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्‍त तथा सदस्‍य विजय साळवे यांनी केले आहे. 

जिल्‍हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला येथे जात प्रमाणपत्राचे प्रस्‍ताव त्रूटी पुर्ततेविना प्रलंबित आहे. अर्जदारांना नोंदणी केलेल्‍या भ्रमणध्‍वनीवर लघुसंदेश नोंदणी केलेल्‍या ई-मेलव्दारे त्रुटी  कळविण्‍यात आल्‍या आहेत. तरी सुध्‍दा  अर्जदारानी त्रुटीची पुर्तता न केल्यामुळे मोठया प्रमाणात प्रस्‍ताव प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणे विचारात घेता ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्‍या अर्जदारांना त्रुटी पुर्तता किंवा कागदपत्राची पुर्तता बुधवार दि. 23 फेब्रुवारीर्यंत करावे. कागदपत्रांची पुर्तता न केल्‍यास त्‍यांच्‍या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल, यांची नोंद घ्यावी.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ