कोविडःआरटीपीसीआरमध्ये १५ पॉझिटिव्ह, ३४ डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन दोन पॉझिटीव्ह

 अकोला दि.१९(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १९३ अहवाल प्राप्त झाले. त्यात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून एक असे एकूण १५ जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.१८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५०७७(४९०९६+१५०२+९५)झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. १४ व खाजगी १) १५ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी दोन = एकूण पॉझिटीव्ह १७.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३६६९१२ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६२८०० फेरतपासणीचे ४१० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३७०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३६६९१२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३१७८१६आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर १५  पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात १४  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सात पुरुष, सात स्त्री रुग्ण आहेत.  त्यातील पाच जण हे अकोट येथील, तीन जण मुर्तिजापूर येथील, तेल्हारा व बार्शी टाकळी  येथील प्रत्येकी एक तर चार जण हे अकोला शहरातील आहेत. खाजगी लॅबच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

३४ जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

१६५ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५०७७(४९०९६+१५०२+९५) आहे. त्यात ११६४ मृत झाले आहेत. तर ६३७४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १६५ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः २०३ चाचण्यात दोन पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१८) दिवसभरात झालेल्या २०३ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 

 काल दिवसभरात बार्शीटाकळी येथील एक, मूर्तिजापूर येथील एक, तेल्हारा येथील दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात १६५,  हेगडेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोट येथील दोन चाचण्यात एक, शासकीय महाविद्यालय येथील २८ चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे एकूण २०३ चाचण्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ