कोविडःआरटीपीसीआरमध्ये 65 पॉझिटिव्ह, 153 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन आठ पॉझिटीव्ह

अकोला दि.6(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 374 अहवाल प्राप्त झाले. त्यात 52 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 13 असे एकूण 65 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 153 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64718(48885+14947+886) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 52  व खाजगी 13) 65 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी आठ = एकूण पॉझिटीव्ह 73.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 363715  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 359619 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3686 नमुने होते. आजपर्यंत एकूण 363715 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 314830 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 65  पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 52  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 25 पुरुष, 27 स्त्री रुग्ण आहेत.  त्यातील 17 जण हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील चार, पातूर येथील दोन, तेल्हारा येथे आठ, मुर्तिजापूर येथील 15, बाळापूर येथील एक, अकोट येथील पाच रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 13  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

153 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 153 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

706 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64718(48885+14947+886) आहे. त्यात 1162 मृत झाले आहेत. तर 62850 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 706 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 390 चाचण्यात आठ पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.5) दिवसभरात झालेल्या 390 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला येथे चार, बाळापूर येथे दोन, बार्शीटाकळी येथे चार, पातूर येथे चार, तेल्हारा येथे नऊ, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 301, जिल्हा आरोग्य कर्मचारी दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 33 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर अकोट येथे पाच चाचण्यात एक, मुर्तिजापूर येथे चार चाचण्यात दोन, हेडगेवार लॅब येथे 22 चाचण्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 390 चाचण्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना