कोविडःआरटीपीसीआरमध्ये 21 पॉझिटिव्ह, 121 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन एक पॉझिटीव्ह


अकोला दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 250 अहवाल प्राप्त झाले. त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून आठ असे एकूण 21 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64824(48959+14961+904) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 13 व खाजगी 8) 21 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 1 = एकूण पॉझिटीव्ह 22.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 364817 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 360710 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3697 नमुने होते. आजपर्यंत एकूण 364817 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 315858 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 21 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 13  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात नऊ पुरुष, चार स्त्री रुग्ण आहेत. त्यातील सहा जण हे अकोला शहरातील, अकोट येथील दोन, तर अकोला ग्रामीण, मुर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

121 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

353 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64824(48959+14961+904) आहे. त्यात 1162 मृत झाले आहेत. तर 63309 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 353 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 151 चाचण्यात सात पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.9) दिवसभरात झालेल्या 151 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोट येथे आठ, पातूर येथे चार, मुर्तिजापूर येथे दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 103, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 25, हेडगेवार लॅब येथे सात चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर अकोला ग्रामीण येथे दोन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 151 चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ