कोविडःआरटीपीसीआर व रॅपिडमध्ये शुन्य पॉझिटिव्ह; एक मृत्यू तर आठ डिस्चार्ज;


अकोला दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)  38 अहवाल प्राप्त झाले. त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच खाजगी लॅब मधून एकाचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दिवसभरात आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65141(49144+15032+965) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. शुन्य व खाजगी 1) 01 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य= एकूण पॉझिटीव्ह 01.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 368402 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 364247 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 368402 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 319258 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर एक पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. तर खाजगी लॅबच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

आठ जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण चैत्री ता. पातूर  येथील 64 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

45 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65141(49144+15032+965) आहे. त्यात 1165 मृत झाले आहेत. तर 63931 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 45 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ